Lokamanya Tilak Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
4.2
4 of 23
Biographies
टिळक यांचे समकालीन डॉ.गोपाळ कृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, वा दादाभाई नोरोजी यांच्या तुलनेत अर्थशास्त्र हा टिळक यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता. म्हणजे टिळक अधिकृतपणे अर्थशास्त्र शिकलेले नव्हते. त्याची काहीएक खंत त्यांना असावी. दादाभाई वा न्या.रानडे, गोखले विविध आर्थिक मुद्दे मांडत आहेत आणि आपण मात्र त्यावर गप्प हे टिळकांसारख्यास पचणे शक्य नाही. म्हणूनही असेल, पण बळवंतरावांनी रितसर अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला. संबंधित विषयांचे सांगोपांग वाचन केले. अशा अनेक मार्गांनी स्वतःस सिध्द केल्यानंतर टिळकांनी या क्षेत्रात मारलेली मुसंडी अचंबित करणारी आहे.
Release date
Audiobook: 1 August 2020
English
India