Step into an infinite world of stories
4.4
1 of 1
Religion & Spirituality
`कैवल्यवारी` म्हणजे पंढरीच्या वारीचा सांगावा देणारा एक सांगीतिक श्राव्यानुभव आहे. ग्यानबा-तुकाराम असा गजर करत वारी देहू-आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करते, तेव्हा तिचं वाटेतील विविध टप्प्यांतील दर्शन घडविणारा हा सांगीतिक आविष्कार. भक्तीरसानं ओथंबलेल्या आपल्या स्वरांतून यात सहभाग घेतला आहे, पं. सुरेश वाडकर, पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, राहुल देशपांडे, अवधूत गांधी, कार्तिकी गायकवाड, शमिका भिडे अशा दिग्गज गायकांनी. संगीतकार पं. कल्याणजी गायकवाड यांच्या चालींना संगीत संयोजन लाभले आहे कमलेश भडकमकर यांचे. आषाढी वारीच्या निमित्ताने ही सारी संकल्पना ज्यांनी साकार केली ते ज्येष्ठ पत्रकार, संवादक व संत साहित्याचे अभ्यासक राजेंद्र हुंजे आणि ज्यांच्या शब्दांतून हा प्रकल्प आकारास आल्या त्या गीतकार सौ. वर्षा हुंजे यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांची रंगलेली ही संवादात्मक, सांगीतिक कैवल्यवारी! श्रिया क्रिएशन्सच्या सौजन्याने ही भक्तीमैफल आपणापर्यंत पोहोचते आहे.
Release date
Audiobook: 6 July 2022
English
India