Step into an infinite world of stories
4.4
1 of 13
Personal Development
आजच्या स्पर्धेच्या फास्ट जगात आपण हरवून गेलो आहोत असं बरेचदा वाटतं. या वाटण्यातून निर्माण होते अस्वस्थता, निराशा. आणि त्यामुळे यश आपल्यापासून आणखी लांब पळतं. यश मिळवायला नक्की काय लागतं? यश मिळवायला बुद्धीमत्ता, सातत्य, मेहनत लागते हे खरंच आहे. पण हे यश पचवायचं आणि टिकवायचं असेल तर लागते भावनिक बुद्धीमत्ता. आणि भावनिक बुद्धीमत्तेचा महत्वाचा पैलू म्हणजे भावनांचा समतोल साधता येणं. तो साधायचा असेल तर आपल्याला आपला आतला आवाज ऐकू यायला हवा. अपयश, निराशा, दुःख, वेदना यातून कोणाचीच सुटका नाही. पण त्यावर मात करायची असेल तर स्वतःचा स्वतःशी होणारा संवाद ऐकायला हवा. आणि तो कसा ऐकायचा हे समजून घ्यायचं असेल तर 'सखा आत्मसंवाद' या पुस्तकातले विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव ऐकायला हवेत. 'सखा आत्मसंवाद ' हा स्वसंवादात्मक लेखांचा मराठीतील कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या आयुष्यातील प्रवासात आलेल्या अनेक चढउतारांमधे त्यांचा त्यावेळी स्वतःशी कसा संवाद सुरू होता याच्या आठवणी यात सांगितल्या आहेत. ही त्यांच्या स्वसंवादाची कहाणी श्रोत्यांना प्रेरणा देणारी आहे आणि स्वतःला शोधायला मदत करणारी आहे.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051714
Release date
Audiobook: 21 May 2022
Tags
English
India