Step into an infinite world of stories
राज... एक कोवळा तरूण... पत्त्यांच्या खेळात त्याच्या हातून चुकून एक खून होतो आणि शिक्षा म्हणून तो तुरूंगात जातो. तिकडे त्याला भेटतो कुदरत चाचा म्हणजेच पूर्वाश्रमीचा ‘बुलडॉग’! बुलडॉगने आयुष्यभर वाईट धंदे केलेले असतात, पण मरणार्या बापाखातीर तो हे सर्व बंद करतो... तिथे त्याला भेटतो भानू दरोडेखोर. भानूची बायको पारो आणि छोटी मुलगी तरल यांच्याकडे पाहून तो भानूचे गुन्हे स्वत:च्या अंगावर घेतो आणि फसतो. भानू बदलत नाहीच पण स्वत:च्या बायका-मुलीचे आयुष्य बरबाद करायला निघतो. हे सर्व समजल्यावर राज ठरवतो बुलडॉगच्या वतीने बदला घ्यायचा. पण कसा? कारण कुदरतला आठवत असती ती फक्त छोट्या तरलला सांगता सांगता अर्धा राहिलेली गोष्ट... आकाशी परीची...जादूचा दिवा असलेली, उडती सतरंजी असलेली, एका दुष्ट जादूगाराच्या तावडीत सापडलेली राजकुमारी आणि तिला सोडवायला जाणार्या राजपुत्राची! ही गोष्ट होणार का पूर्ण? राज कुदरतचा विश्वासघाताचा सूड भानू आणि त्याच्या कुटुंबाकडून घेणार? की तरलला दुष्ट जादूगाराच्या तावडीतून सोडवणार? जाणून घ्या सुहास शिरवळकर लिखित ही आगळीवेगळी ‘इन्सानियत’... आजच स्टोरीटेलवर!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356041295
Release date
Audiobook: 2 July 2022
English
India