Step into an infinite world of stories
एक-शून्य-शून्य, खाकी, चाळ नावाची वाचाळ वस्ती इत्यादी गाजलेल्या मालिका, अफलातून, घनदाट, एक लफड विसरता न येणार! अशा यशस्वी नाटकांचे लेखक विक्रम भागवत यांची थरारक कादंबरी.
अेक निलंबित अे टि अेस् ओफिसर, अेक क्राईम रिपोर्टर तरूणी, आणि अेक वॄत्तपत्र संपादक. या तीन भिन्न व्यक्तिंच्या स्वतंत्र पण तरीही अेकमेकाना छेदणाया आयुष्याचा पट अतिशय ताकदीने आणि अुत्कंठावर्धक रीतीने मांडणारी कादंबरी. या कादंबरीतील तिन्ही मुख्य पात्रे, त्यांचा भवताल आणि त्यातील मोजक्याच व्यक्तिरेखांमधुन कादंबरीचा आशय गडद होत जातो हे या कादंबरीचे सर्वात मोठे यश. कादंबरीची निवेदनात्मक शैली खुप परिणामकारक आहे. या तिघांची हि कथा “ते भेटल, “ते जगले” आणि “विलग झाले” अशी ठोकळेबाज न राहता हि कादंबरी म्हणजे होते अेक धांडोळा : • या तिघांच्या आयुष्यातील भावनात्मक गुंतागुंतीचा, त्यांच्या भिन्न भवतालचा • आपल्या किडलेल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा • अंडरवर्ल्ड जगताचा आणि • अेका आरंभाच्या अंताचा किंवा अंताच्या आरंभाचा…
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9788195312443
Release date
Audiobook: 23 December 2021
Tags
English
India