Step into an infinite world of stories
4.3
59 of 77
Economy & Business
गेल्या वर्षी कोरोनाचा कहर संपला आणि दोन वर्षानंतर सिनेमा हॉल प्रेक्षकांसाठी खुले होऊ लागले. आता किती फिल्म्सचा पुर येईल असं वाटत होतं. मल्टीस्टारर ‘सूर्यवंशी’ आणि इतरही अनेक फिल्म्सची लोक वाट बघत होते. आणि अचानक एक कधीच नाव न ऐकलेला, कसलीही पब्लिसिटी नसलेला, आपल्याला न कळणाऱ्या भाषेतला सिनेमा आला आणि २०२१ चा सगळ्यात मोठा सिनेमा बनून गेला. त्याचं नाव होतं ‘पुष्पा: द रायजिंग’! अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘सूर्यवंशी’ जितक्या लोकांनी पाहिला नाही तितका पुष्पा पाहिला. ‘पुष्पा’चं आणखी कौतुक वाटतं, कारण हा काही बाहुबली नव्हता, ज्यात खूप मोठे इफेक्ट्स होते, अॅक्शन होती म्हणून किंवा खूप पब्लिसिटी झाली होती म्हणून लोक बघायला जातील. आणि विशेष गोष्ट म्हणजे पुष्पा हा काही एकमेव नाही. २०२२ मध्येही लागोपाठ आलेल्या RRR आणि KGF २ ह्या फिल्म्सही हिंदी फिल्म्सपेक्षा जास्त कलेक्शन करताना दिसत आहेत.
Release date
Audiobook: 11 May 2022
English
India