Step into an infinite world of stories
4
Non-Fiction
हृदयविकार, हार्टअॅटॅक हे आज सर्वपरिचित शब्द आहेत. हे शब्द सर्वपरिचित होण्याचे कारण म्हणजे या विकाराची व्याप्ती ! हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो ? त्याचे निदान कसे करतात ? त्यावर उपाय काय ? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य माणसापुढे उभे राहतात. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हृदयविकाराबद्दल वैज्ञानिक माहिती देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे हृदयविकारावरील उपचारांचे ‘ गाइड ’ नव्हे. प्रत्येक प्रकरणात त्या विषयाच्या संदर्भात थोडी वैद्यकीय विज्ञानाची ऐतिहासिक माहिती दिली आहे. आधुनिक वैज्ञानिक विज्ञान हा मंत्र नसून विकसित होत गेलेले ज्ञान आहे हे दाखवून देणे हा या माहितीची उद्देश ! वैद्यकीय तंत्र, कौशल्य व ज्ञान यामागची जी वैज्ञानिक विचारसरणी असते तिचा परिचय वाचकांना व्हावा ही इच्छा. आधुनिक विज्ञानाची बलस्थाने व मर्यादा कोणत्या हे समजल्यास वैद्यकीय विज्ञानाकडून रास्त अपेक्षा ठेवता येतील. विविध निदानीय पद्धती कशा निर्माण होतात, त्यांचा उपयोग खर्चफलकारक पद्धतीने कसा करून घेता येईल, हृदयविकारावरील उपचारामागचा वैज्ञानिक विचार काय, विकाराचा नैसर्गिक प्रवाह कसा असतो अशा सूक्ष्म व महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न येथे केला आहे. या पुस्तकातील दोन लेख समजण्यास सोपे व्हावे म्हणून संवादरूपात लिहिले आहेत. ठिकठिकाणी इंग्रजी पारिभाषिक शब्द व त्याला मराठी प्रतिशब्द दिले आहेत. मराठी शब्द वापरून रूढ होतील अशी आशा आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9788193405659
Release date
Ebook: 6 May 2021
English
India