Step into an infinite world of stories
65 of 77
Economy & Business
तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण हे मूलमंत्र असलेल्या एकविसाव्या शतकातील आधुनिक काळात आपण वावरतो आहोत. मागच्या काही शतकांचा, विशेषतः एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास पाहिल्यास जगभरात सर्वत्र झालेल्या स्वातंत्र्याच्या, प्रबोधनाच्या आणि समतेच्या चालवली ठळकपणे नजरेत भरतात. फ्रेंच राज्यक्रांती असो वा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देणारी अमेरिकन चळवळ असो… या सगळ्यातच स्त्रियांच्या मूलभूत हक्कांची आणि स्त्री- पुरुष समानतेची विश्वव्यापी मांडणी करण्यात आली. त्याचीच फळे आपण आज एकविसाव्या शतकात चाखत आहोत. सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आज आपला वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. पण ही प्रक्रिया खरंच अपेक्षित वेगाने घडतेय का? मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या राजकीय क्षेत्रात स्त्रिया सध्या कुठे आहेत? त्यांचा राजकारणातील सहभाग पुरेसा आहे का? नसेल तर त्याची कारणं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं चाचपडून पाहण्याचा हा एक प्रयत्न…
Release date
Audiobook: 13 June 2022
English
India