Step into an infinite world of stories
Personal Development
साधारणत: फेब्रुवारी उजाडला की आपल्या घरांमधले वातावरण जरा तंग होते. दूरदर्शन संच बंद होतात. रात्री दिवे जळू लागतात आणि पहाटेसुद्धा ते प्रकाशू लागतात. मुलांच्या चेहऱ्यावर तणाव दिसतोच... पण त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरसुद्धा तो अतोनात दिसू लागतो़ एकूणच युद्धसदृश वातावरण घराघरांमध्ये जाणवू लागते. ह्याचे एकमेव कारण ... ... येऊ घातलेली परीक्षा ! आपल्या शिक्षण-पद्धतीचा तो आत्मा आहे. विषय समजून घेण्यापेक्षा घोकमपट्टी करून स्मरणशक्तीच्या जोरावर कागदावर सर्व उतरवून काढायचे आणि मार्क मिळवायचे अशी ही शिक्षण-पद्धती. आणि सर्व ताणतणावांच्या मुळाशी जरी ही सदोष शिक्षण-पद्धती असली तरी ती बदलणे आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर ह्या ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देणे. आणि हाच ह्या पुस्तकाचा हेतू आहे... मध्यवर्ती गाभा आहे. प्रा. स्वाती धर्माधिकारी ह्या मानसशास्त्रज्ञ आहेत. तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूर इथे त्या मानसशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. त्या खूप नावाजलेल्या समुपदेशकसुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विषयक अनेक समित्यांवर त्या कार्यरत आहेत. अनेक शहरांमधून त्यांची व्याख्याने होत असतात.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789388740746
Release date
Ebook: 7 April 2021
English
India