रमाचा बाबा हिमालयन कार रॅलीमध्ये भाग घ्यायचा ठरवतो. सिमला ते श्रीनगर अशा अडीच हजार किलोमीटर, अतिशय अवघड, वळणावळणाच्या, बर्फातल्या रस्त्यावर होणाऱ्या या रॅलीत १० वर्षांच्या रमाला काहीही करून जायचंच असतं. आईबाबाबरोबर रॅलीला जायचा चान्स मिळवण्यासाठी ती एक भन्नाट आयडिया करते. पण रॅलीला गेल्यावर तिच्या लक्षात येतं, की अवघड रस्ते, थंडी, बर्फ ...ये तो बस शुरुआत है... तिथे तिला एक डेंजर कॉन्स्पिरसी चुकून ऐकू येते. ती त्याबद्दल सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते, पण तिचं कोणीच ऐकत नाही. तिच्या लक्षात येतं की तिने जर काही केलं नाही तर भयंकर नुकसान होईल. शेवटचा प्रयत्न म्हणून ती बाबाच्या रॅलीच्या जिप्सीमध्ये लपून बसते. पण तिने घेतलेल्या एवढ्या रिस्कचा काही उपयोग होतो का? तिला ती कॉन्स्पिरसी थांबवता येते का? का तिच्या आगाऊपणामुळे ती सगळ्यांचाच जीव धोक्यात घालते?
Step into an infinite world of stories
English
India