Vadhiv Onsight Mars Tight - S01E01 Yogesh Shejwalkar
टेक्नॉlलॉजीने परिसीमा गाठलेलं वर्ष म्हणजे 2080. याच टेक्नॉlलॉजीचा वापर करून रिच अँड फेमस माणसं पृथ्वीवरून कल्टि मारून मंगळावर निवांतपणे रहात होती. तर मिडिल क्लास माणसं पृथ्वीवर अशुद्ध ऑक्सिजन घेत, विषारी पाणी आणि केमिकलने थबथबलेलं अन्न खात ‘लाईफ पील्स’च्या आधाराने जगत होती. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं एकच स्वप्न होतं की कंपनीकडून काहीही करून ‘ऑनसाईट’ला म्हणजे मंगळावर जायचा चान्स मिळवायचा. असाच चान्स मिळवण्याचा जमदग्नीने प्रयत्न केला आणि त्याच्या व्हाईट कॉलर आयुष्यात ‘राडा’ सुरू झाला. पृथ्वी आणि मंगळाच्या कॅनव्हासवर रंगणारी ही टर्रेबाज गोष्ट... म्हणलं तर एका कुटुंबाची आहे… म्हणलं तर गॅंगवॉरची आहे... म्हणलं तर काळाच्या पलीकडे असलेल्या मूलभूत भावनांची आहे.
Step into an infinite world of stories
English
India