पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशकात सुरू झालेलं खुनांचं गूढ़ सत्र, दिशाहीन तपासयंत्रणा आणि या सगळ्यात बातमीच्या निमित्तानं अडकत जाणारा विशीतला एक नवशिका क्राईम रिपोर्टर! या गोष्टीत फक्त चोर-पोलिसांचा खेळ नाहीये तर या निमित्तानं उफाळून येणारं राजकारण आहे…पेपरांमधलं, क्राईम बीट बघणाऱ्या बातमीदारांमधलं, पोलिसांमधलं आणि राजकारण्यांमधलही.
सिरियल किलरमध्ये आहे श्वास रोखून धरायला लावणारा थरार आणि कमालीच्या आणीबाणीच्या परिस्थितीत सापडल्यानं दिसणाऱ्या टोकाच्या मानवी भावभावना…सारं काही गमावल्यानं येणारं रितेपण अन् त्याच वेळी शेवटच्या क्षणी बाजी पलटवण्याची शक्यता निर्माण झाल्यानं येणारा दूर्दम्य आशावाद! पत्रकार निरंजन मेढेकर लिखित अभिनेता नचिकेत देवस्थळीच्या आवाजात उलगडत जाणारी अस्सल मराठी क्राइम सिरिज.
Step into an infinite world of stories
English
India