ही कथा आहे हैद्राबादमधील निजामाच्या दरबारातील शूर मराठा सरदार रावरंभा निंबाळकर आणि मुस्लिम राजनर्तकी माहेलका यांच्या प्रेमाची. तो काळ होता सन 1775 चा - बाजीराव-मस्तानीनंतर बरोबर शंभर वर्षानंतरचा….मात्र ही प्रेमकथा इतिहासकार आणि लेखकांच्या लेखणीत सापडली नाही. रावरंभा आणि माहेलका दोघंही शूर योध्दा तर होतेच, विशष म्हणजे दोघांना कलेची उत्तम जाण होती. माहेलका राजनर्तकी असूनही युध्दकलेत निष्णात होती. दोघांतील समान गुणांमुळे ते एकमेकांकडे आकर्षिले गेले. माहेलकाने आपला जीव रावरंभांवर आेवाळून टाकला. परंतू अनेक मुस्लिम सरदार माहेलकाच्या सौंदर्यावर घायाळ झाले असल्यामुळे दोघांच्या प्रेमाला अनेक दिव्यातून जावे लागले. या सीरीजमधून राजा रावरंभा आणि माहेलका यांच्या प्रेमकहाणीचा शोर्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
Step into an infinite world of stories
English
India