आपल्याकडं लहानपणासूनच काही विषयांबद्दल बोलणं, कुतुहल म्हणूनही त्याविषयी काही जाणून घेणं, प्रश्न विचारणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्यांनाही त्याविषयी ओ की ठो माहिती नसते. सेक्सच्या बाबतीत विचार करता समलैंगिक रिलेशन्सचा नंबर त्यात सगळ्यात वरचा लागेल. वास्तविक सुप्रीम कोर्टानं ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी आपल्या ऐतिहासिक निकालात आयपीसी कलम ३७७ कलम रद्दबातल ठरवत सज्ञान जोडप्यांतील समलैंगिक संबंधांना मान्यता दिलीय. दुसरीकडं बॉलिवुडमध्येही ‘बधाई दो’सारख्या या विषयावर भाष्य करणाऱ्या फिल्म्स येताहेत. थोडक्यात या विषयावर मोकळेपणानं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळंच सेक्सवर बोल बिनधास्तच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण एका स्पेशल आणि अगदी मेड फॉर इच अदर म्हणता येईल अशा कपलला इन्व्हाईट केलंय. दोन वर्ष लिव्हइनमध्ये राहून त्यांनी नुकतीच आत्ता एंगेजमेंटही केलीय. स्वागत करूया लीना नायर आणि ऋजुता जामगावकरचं!
Step into an infinite world of stories
English
India