आज केजी ते पीजी मधले सर्व विद्यार्थी अगदी काही नगण्य अपवाद वगळले तर प्रतेय्क जण अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी ट्युशन , क्लास , कोचिंग . थोडक्यात काय तर शाळा किंवा कॉलेज व्यतिरिक्त पर्याय निवडताना दिसतात . काही ठिकाणी उघडपणे नसलं तरी कॉलेज फक्त नावाला असतं. अशी काय अपरिहार्यता निर्माण झाली आहे कि अभ्यासक्रमातील विषय शिकण्यासाठी शाळा कॉलेज व्यतिरिक्त इतर पर्याय शोधावे लागतात.
आणि ह्याच विषयावर आपण हार्ड हीटिंग गप्पा मारणार आहोत पुण्यातील विख्यात बेहेरे क्लासेस च्या बेहेरे सरांशी
प्राध्यापक चंद्रशेखर बेहेरे हे बेहेरेज क्लासेस या पुण्यातील 42 वर्ष जुन्या कॉमर्स प्रशिक्षण संस्थेचे फाउंडर डायरेक्टर, आकड्यामध्ये बोलायचे झाले तर आज पर्यंत एक लाख तासांपेक्षा जास्त शिकविण्याचा त्यांचा अनुभव आहे , 53 हजार विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलय. त्यापैकी 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी सीए, सी डब्ल्यू ए किंवा सीएस. 15000 पेक्षा जास्त विद्यार्थी एम कॉम किंवा एमबीए झाले आहेत,
बेहेरे सरांना राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्कार, गुरु द्रोणाचार्य अवॉर्ड, मदर तेरेसा मेमोरियल अवॉर्ड असे अनेक सन्मान प्रताप आहेत. असे सन्माननीय ,बहुआयामी बेहेरे सर
Step into an infinite world of stories
English
India